VIDEO: “अगं काहीतरी लाज बाळग”, भररस्त्यात टॉवेल काढलं अन्…, तरुणीचा अश्लील डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

Woman Vulgar Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात. या प्रसिद्धीच्या वेडेपणापायी काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी तरुण, तरुणी भररस्त्यात अश्लील प्रकार करू लागतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी इंडिया गेटसमोर चक्क टॉवेलवर डान्स करीत अश्लील चाळे करताना दिसतेय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sannati Mitra🕊️ (@sannati__)


२०१७ मध्ये ‘मिस कोलकाता’ किताब जिंकल्याचा दावा करणारी मॉडेल सन्नाती मित्रा हिने नवी दिल्लीतील इंडिया गेटसमोर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रस्त्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी ती चक्क टॉवेल घालून नाचताना दिसतेय. व्हिडीओ पाहताच इंटरनेट वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी दिल्ली पोलिसांना टॅग करीत कारवाईची मागणी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी पांढरा टॉवेल घालून ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामधील “मेरे ख्वाबों में जो आये” या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटसमोर डान्स करीत असल्याने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sannati Mitra🕊️ (@sannati__)


टॉवेल घालून ही तरुणी अश्लील प्रकारही करताना दिसत आहे. डान्स करता करता मागे वळून तिने टॉवेल काढल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ तरुणीने तिच्याच @sannati__ या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. “आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्व जण तुमच्या धैर्याने, दयाळूपणाने आणि सहानुभूतीने इतरांना प्रेरणा आणि प्रेरणा देत राहा,” अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला सात लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “तिला अटक करा आणि तिला थर्ड डिग्री द्या. तरुणांसमोर आदर्श ठेवा. केवळ काही व्ह्युज मिळविण्यासाठी नवीन पिढी खालच्या पातळीवर जात आहे.” तर दुसऱ्याने, “काहीतरी लाज बाळगा”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “याला परवानगी कशी देतात? यादरम्यान पोलीस कुठे होते.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top