Baba took a step forward with Chimukalya, the tokavar of the timber was rising and…, look, it is shocking. VIDEO

Suicide Shocking Video : प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा कठीण काळ येतो जिथे सगळंच संपलंय, असं वाटायला लागतं आणि माणूस अगदी कसलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलतो. देशात अनेक वर्षांपासून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. अशा प्रकरणामध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही त्रास भोगावा लागतो. सध्या अशीच एक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक माणूस आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊ…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr.Samiullha Kazi (@dr.samiullhakazi)


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस इमारतीच्या टोकावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. या गुन्ह्यात तो स्वत:सह चिमुकल्याचाही बळी घेऊ पाहतोय. एका हातात लहान मुलाला घेऊन, हा माणूस स्वत:चं आयुष्य संपवायला निघाला आहे. यादरम्यान तिथे खूप गर्दी जमल्याचे पाहायला मिळतेय. अनेक जण त्याला खाली उतरण्यासाठी विनवणी करीत आहेत. इतक्या टोकाचं पाऊल नका उचलू, असंही ते सांगताना दिसतायत; पण तो माणूस कोणाचंही ऐकत नाही. शेवटी सगळ्यांशी हातवारे करून बोलत असताना त्या व्यक्तीचा तोल जातो आणि तो बाळासह आतल्या बाजूला उडी मारतो आणि कोणीही त्याला अडवण्याच्या आधी परत वर चढण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचा हा प्रयत्न फसतो. कारण- आजूबाजूला जमलेली माणसं अगदी क्षणाचाही विलंब न करता पुढे होऊन, त्याचा आणि लहान मुलाचा जीव वाचवतात. पण, वाचवल्यानंतर सगळेच त्या माणसावर तुटून पडतात आणि लहान मुलासह असा कठोर निर्णय घेतल्याने त्याला मारू लागतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr.Samiullha Kazi (@dr.samiullhakazi)


हा व्हिडीओ @dr.samiullhakazi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आर्थिक अडचणींमुळे त्याने बाळासह हे पाऊल उचलल्याचे दिसते’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल पाच दशलक्ष व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “त्याच्याशी कोणीतरी बोलण्याची गरज आहे. तो नक्कीच अस्वस्थ आहे.” दुसऱ्याने, “जर तुम्ही माणूस असाल, तर कृपया त्याला त्याच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करा. त्याला दोष देऊ नका आणि शिक्षा देऊ नका”, अशी कमेंट केली. एकाने, “असं करायचं असेल, तर मुलांना जन्माला घालू नका. कशाला स्वत:बरोबर त्या चिमुकल्याचा जीव धोक्यात घालता”, अशी कमेंट केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top