Beloved sister plan, money will be recovered? New option has come, check the money received also

Ladaki Bhain Yojana Aditi Tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या.

याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

जाहीरनाम्यात काय आहे?

  • लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.
  • सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
  • 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top