“Dolam Rokhoon Asan Kay Baghta Ho Pavanam…” Tarunachya Bhannat Lavnisamore Gautami Patilhi Fiki Padel.

Viral Boy Lavani Video : लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा लावणी ही महिलांकडून सादर केली जायची पण कालांतराने पुरुषांनी सुद्धा आवडीने लावणी सादर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. तरुणाच्या लावणीसमोर गौतमी पाटीलही फिकी पडेल अशी भन्नाट लावणी या तरुणानं सादर केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Dancer (@rajdancer2021)


शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काही जण मग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असंच स्नेहसंमेलन १० वी च्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भरवलं होतं. यावेळी त्यांच्यातल्याच एका माजी विद्यार्थ्यानं शिक्षक आणि वर्ग मित्रांसमो त्याची कला सादर केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Dancer (@rajdancer2021)


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळे माजी विद्यार्थी आणि शिक्षक बसलेले आहेत. आणि यावेळी हा तरुण मधोमध लावणी सादर करत आहे. यावेळी तरुणाचे हावभाव आणि स्टेस्प पाहून तुम्हीही थक्क व्हाल.हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण शाळेच्या जुन्याआठवणीत हरवून गेले.इतक्या वर्षांनंतरही शाळेतली नाती जपत या मंडळींचं एकत्र येणं आणि पुन्हा तेच दिवस जगणं हे सर्वकाही पाहताना नेटकऱ्यांनाही त्यांची शाळा आठवली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Dancer (@rajdancer2021)


सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला “आमच्या १० वी च्या गेट टू गेदरला लावणी केली. आजपर्यंत खूप लावण्या केल्या पण ही स्पेशल होती कारण ही मित्रांसाठी आणि शिक्षकांसाठी होती खूप छान वाटले हा अविस्मरणी क्षण होता.” असं कॅप्शन लिहलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top