कोणाचं कर्म कोणाला भोगावं लागलं; गाडी चालवताना मोबाईल बघायची सवय असेल तर हा VIDEO पाहाच, घडलं भयानक

Accident Viral video : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. हायस्पीड इंटरनेटमुळे मोबाईल फोनची क्रेझ लोकांमध्ये वाढतच चालली आहे. रात्री झोपताना, सकाळी उठताना, जेवताना किंवा प्रवार करताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशातच गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा, असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत. कारण, यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा मंडळींचे डोळे उघडवणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एकापेक्षा एक भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर येतात. अशीच एक अपघाताची घटना समोर आलीय. एका मोबाईलमुळे अक्षरश: कार पलटी झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Adesh Bhujbal (@__adesh_bhujbal__)


या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.एका स्कूटी चालकाची शिक्षा एका कार चालकाला भोगावी लागली आहे. सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपला भरपूर वेळ मोबाईल स्क्रीनसमोर घालवत असतो. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जिथे लोक वेळ काळ याचं भान न ठेवता मोबाईलमध्ये गुंग असतात असाच एक व्यक्ती एका हाताने स्कूटी चालवत होता तर दुसऱ्या हाताने मोबाईल वापरत होता. याच दरम्यान जे घडलं ते धडकी भरवणारं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Adesh Bhujbal (@__adesh_bhujbal__)


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्ता रिकामा दिसत आहे. यावेळी एका बाजूनं कार येते तर एका बाजुनं एक व्यक्ती स्कूटीवरुन येतो, मात्र हा व्यक्ती एका हाताने गाडी चालवताना दिसत आहे आणि एका हाताने मोबाईलवर बोलत आहे. यावेळी मोबाईलवर बोलण्याच्या नादात हा व्यक्ती समोरची कार बघत नाही आणि सरळ गाडी चालवत जातो. यावेळी समोरुन कार येते आणि स्कूटी चालकाला उडवणार तितक्यात कार चालकाचं नियंत्रण सुटतं आणि कारचा जोरदार अपघात होतो. यावेळी स्कूटीचालक थोडक्यात बचावतो, मात्र कारचा भीषण अपघात होतो. स्कूटी चालकाच्या एका चुकीमुळे कार चालकाचा अपघात झाल्याचं दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Adesh Bhujbal (@__adesh_bhujbal__)


सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करून वाहन चालवताना मोबाइलचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स थक्क झाले आहेत. यासोबतच रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, असं आवाहनही ते करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top