काय गरज होती का? मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्टेजवर गेला अन् झाला मोठा पचका; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Funny video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हि़डीओ पाहून धक्का बसतो. असाच एक पोट धरुन हसवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मुलांच्या मनात नेहमी एक प्रश्न घोळत असतो. तो म्हणजे मुलींना आपल्यातील कोणती गोष्ट आणि नेमकं काय आवडतं? आपण कसे वागलो तर त्या इम्प्रेस होतील? यासाठी तरुण संधी मिळेल तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी करत मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका तरुणाचा मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात चांगलाच पचका झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Munna Yadav (@munnayadavpradhan)


हा व्हिडीओ बिहारमधील बाघा येथील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला आणि तरुणीला भोजपूरी गाण्यावर नाचताचा पाहू शकता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक तरुण मोठ्या ऐटित स्टेजवर आला आणि स्टंट मारून दाखवण्याचा प्रयत्न करून लागला. लक्षवेधी बाब म्हणजे त्यानं आधी टाळ्या वगैरे वाजवून माहोल तयार केला. त्यामुळे अर्थातच लोकांना वाटलं हा काय करून दाखवणार आहे अन् काय नाही. पण तो तर फुसका बार निघाला. कारण कोलांटी उडी मारताच तो खाली पडला आणि अक्षरश: स्टेजही तुटला. ज्या मुलींना इंप्रेस करण्यासाठी त्यानं स्टंट मारला त्यांच्यासमोरच तो अक्षरश: तोंडावर पडला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Munna Yadav (@munnayadavpradhan)


हा व्हिडीओ saini_mukesh6165 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. खरं तर हा व्हिडीओ जुना आहे. पण पुन्हा एकदा व्हायरल होतोय. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून “जर झेपत नाही तर मग शायनिंग मारायला गेलासच का?” असं एकानं म्हंटलं आहे. तर आणखी एकानं “काय गरज होती का? बिचारा मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् तोंडावर पडला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.अनेकांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय असे स्टंट करू नका असे सल्ले सुद्धा काही जणांनी दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top