Has he come? Beating the child half-way for crying; Mag tondat masala bharla, video batana tumihi breath rokhoon dharal

Mother Viral Video : आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करीत असते; पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

 


अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईने आपल्या बाळाला इतका त्रास दिला, जितका कोणी सावत्र आईदेखील देणार नाही. या महिलेनं आपल्या १० महिन्यांच्या बाळाला रडतंय म्हणून आधी मार मार मारलं आणि मग त्याच्या तोंडात मसाला भरला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.

 


आई होणं हे जगातील सर्वांत मोठं आणि सुंदर सुख असतं. नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करून आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं. त्यामुळे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो. मात्र, या महिलेचं कृत्य पाहून एक आई असं काही करू शकते यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने आपल्या बाळाला हातात घेतलं आहे. बाळ रडत असल्यानं सुरुवातीला ती त्याला घेऊन फिरत आहे; मात्र बाळ रडायचं थांबत नसल्यानं पुढच्याच क्षणी ही महिला क्रूरपणे बाळाला मारू लागते. त्यानंतर ही आई एका कोपऱ्यात आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसते. तिथेदेखील बाळ रडत असतं म्हणून ही महिला पुन्हा पुन्हा त्याला मरते. हा व्हिडीओ पाहतानाही अंगावर काटा येतो.

 


उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सरकारी शिक्षक असलेल्या मंझनपूरच्या खेरवा (बरौला) येथील सत्येंद्र कुमारने दोन वर्षांपूर्वी श्वेता गौतम हिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर १० महिन्यांनी त्यांची मुलगी शान्वी हिचा जन्म झाला. पण सत्येंद्र सांगतात, “मुलीच्या जन्मापासूनच श्वेताचा स्वभाव चांगला नव्हता. तिनं आपल्या मुलीला ओझे मानलं. मुलगी जेव्हा कधी रडायची तेव्हा श्वेता चिडायची आणि तिला मारहाण करायची.” मुलगी रडल्यावर पत्नी तिच्या तोंडात लाल मिरची पावडर टाकत असे, असा आरोप या महिलेच्या नवऱ्यानं केला आहे. तो पुढे सांगतो की, मला शेजारचेही सांगायचे म्हणून मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तिचं कृत्य दिसलं. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top